आपण काहीच नसतो
तेव्हा
काहीतरी बनण्याचा निश्चय करतो
मग काहीतरी बनतो
तेव्हा
बनलेपण टिकवण्याचा प्रयत्न करतो
आणि इथनं सुरु होते
स्पर्धा
जगण्याची
व्यक्त होण्याची
मग हळुहळु
त्या काहीतरी असण्याची
गंमत वाटु लागते
त्या गंमतीमध्ये सामिल होतो
अहंकारसुध्दा
एका क्युट हिरोसारखा
गुंतुन जातो सहज
रोमॆंटीक होऊन
No comments:
Post a Comment